Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

देशभराहसह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. दुसऱ्या बाजूला वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत आहेत. तरीही कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभुमीवर आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांचा आकडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात कोरोनाचे नवे 120 रुग्ण आढळून आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाहता विविध उपाययोजना करत आहेत. तसेच स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना सुद्धा राज्य सोडून जाऊ नका असे आवाहन करत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सुद्धा नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्यास सांगत असतात. तसेच लॉकडाउन वाढवणे की नाही हे आता नागरिकांच्या हातात आहे. तरीही काही जण लॉकडाउनच्या आदेशाचे पालन न करता त्याचे उल्लंघन करत आहेत.त्यामुळे कोरोनाच प्रादुर्भाव होण्यास अधिक मदत आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 868 वर पोहचला असून आज 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 52 वर गेला आहे.(Lockdown: कल्याण- डोंबिवलीत उद्यापासून भाजीपाला, किराणा दुकानांसह डेअरीही राहणार बंद; पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश)

Tweet:

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये क्वारंटाइनचा शिक्का हातावर असून ही नागरिक बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनाची लक्षणे असलेले काही जण त्याबाबत लपवणूक करत असल्याचे ही दिसून आले आहे. त्यामुळे नादगरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे दिसून आल्यास आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.