प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यातच कल्याण- डोंबिवली (Kalyan- Dombivali) महानगरपालिकेत आज आणखी रूग्ण आढळल्याने येथील कोरोनाबाधितांची संख्या 34 वर पोहचली आहे. संचारंबदी (Lockdown) असतानाही काही नागरिक अत्यावश्यक वस्तूच्या (Essential Material) खरेदीसाठी प्रचंड गर्दी करत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांनी संपूर्ण शहरात संचारबंदी अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, 7 एप्रिलपासून शहरातील मेडिकल, रुग्णालय व दवाखाने वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण शहरात हाहाकार माजवला आहेत. या नियंत्रण मिळण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सध्या संपूर्ण देशात संचारबंदी घोषीत केली असून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, या काळातही काही नागरिक भाजीपाला, किराणा दुकाने आणि दुध डेअरीच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी करताना दिसत आहेत. यातच कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांनी भाजीपाला, किराणा दुकाने आणी दुध डेअरी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आणि गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तंचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुकत डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. मंगळवार संध्याकाळी 5 वाजल्यापासून हे आदेश लागू होणार आहेत. मेडीकल रूग्णालये आणि दवाखाने सेवा वगळता भाजी विक्री किराणा दुकाने आणि डेअरी ही दुकानेही बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गर्दी टाळण्यासाठीच हे प्रतिबंधक करण्यात येत असून, या आदेशाचे उल्ल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- COVID 19: डोंबिवली मधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची विषाणूवर मात; कस्तुरबा रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी कोरोनाबाधित 113 नवे रुग्ण आढळून आले होते. यापैंकी 56 रुग्ण बरे झाले असल्याची माहती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यात आज आणखी नवे 33 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात आतापर्यंत 781 कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत.