मुंबई नंतर कोरोना व्हायरसने (Coronavirus) ठाणे (Thane) , कल्याण आणि डोंबिवली (Kalyan- Dombivli) परिसराला मोठा फटका बसला आहे, मात्र आता डोंबिवली मधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. डोंबिवली मध्ये सर्वात आधी ज्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती त्याने आता या विषाणूंवर मात केली आहे, मागील काही दिवसांपासून हा तरुण कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) उपचार घेत होता. 29 मार्च आणि 1 एप्रिल रोजी त्याची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली ज्यात दिनही वेळेस निगेटिव्ह रिपोर्ट्स आले आणि त्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. असं असलं तरीही या तरुणाला 19 एप्रिल पर्यंत स्वतःला विलगीकरणात ठेवण्याचे आदेश हॉस्पिटल कडून देण्यात आले आहेत. Coronavirus: कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या लग्नात कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांची उपस्थिती, विलिगिकरणात राहण्याची सूचना
प्राप्त माहितीनुसार, हा तरुण 15 मार्च रोजी तुर्की वरून डोंबिवली येथे आला होता, त्यावेळी त्याला होम क्वारंटाइन करून घेण्यास सांगण्यात आले होते, मात्र तरीही हा व्यक्ती म्हात्रेनगर इथे 18 मार्च रोजी हळद आणि 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड मध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत होता. या एका व्यक्तीमुळे लग्न आणि हळदी कार्यक्रमात उपस्थित अनेकांना कोरोनाची लागण झाली हाती तर कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने त्यांना सुद्धा काही दिवस क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले होते.
दरम्यान, शनिवारी 4 एप्रिल रोजी डोंबिवली मधील शास्त्रीनगर रुग्णालयातून क्वॉरंटाइन करून ठेवण्यात आलेला एक रुग्ण पळून गेला होता.यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली होती. सद्य घडीला 24 जणांवर उपचार सुरु होते त्यातील 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर अजूनही 19 जणांवर उपचार सुरु आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीतील महापालिकेचे शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय हे अलगीकरण रुग्णालय म्हणून घोषित केले असून 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणीही काही संशयितांवर उपचार सुरू आहेत.