केडीएमसी महापौर विनीता राणे (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आकडा 181 वर पोहचला असून ही एक चिंतेची बाब आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना गर्दी करुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू नका असे वारंवार सांगितले आहे. तरीही नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभुमीवर कल्याण-डोंबिवलीच्या महापौर यांनी एका लग्नात उपस्थिती लावल्याचे दिसून आले. मात्र या लग्नात एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तरुणीला सुद्धा त्याचा संसर्ग झाला होता. याच लग्नात केडीएमसीच्या महापौरांनी उपस्थिती लावल्याने त्यांना आता होम क्वारंटाइनच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

केडीएमसी महापौर विनीता राणे यांनी 19 मार्चला एका लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. तर लग्नाला आणि हळदीच्या वेळी उपस्थिती लावलेल्या एका नवऱ्याच्या घरातील तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर याचा संसर्ग एका तरुणीला सुद्धा झाली. यामुळे लग्नात उपस्थिती लावलेल्या सर्वजणांचा होम क्वारंटाइनची सुचना दिली आहे. तसेच विनीता राणे यांना सुद्धा पुढील 14 दिवस विलगिकरणात राहण्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. यापू्र्वी तुर्की येथून आलेल्यांनी सुद्धा एका लग्नात उपस्थिती लावली होती. त्यावेळी सुद्धा एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता या 19 मार्चच्या लग्नात उपस्थिती लावलेल्यांनी आमची सुद्धा कोरोनाची तपासणी व्हावी अशी मागणी केली आहे.(मुंबईकरांनो नियम तोडू नका! मुंबई पोलिसांकडे कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर्संना सोसायटीमध्ये प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी; पोलिसांचे गृहनिर्माण संस्थांना आवाहन)

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या 6 पैकी 4 जण हे मुंबईतील असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर येत्या 1 एप्रिल पासून नागरिकांना कोरोना व्हायरससंबंधित उपचार घेण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा वापर करता येणार आहे. याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याचे स्पष्ट केले आहे.