प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्याासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारने लॉकडाउनचे आदेश सुद्धा पुढील काही दिवस लागू राहणार असल्याचा निर्णय जाहिर केला आहे. तरीही नागरिकांकडून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहेत. तर काहीजण कोरोनाची लक्ष दिसून आल्यानंतर सुद्धा घाबरत असून लपून बसत आहेत. मात्र सराकरने कोरोनाची चाचणी करुन त्यासंबंधित वैद्यकिय उपचार घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रात (Maharashtra) आज नवे 286 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 3202 वर पोहचला आहे. तर बळींची संख्या 194 पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सहाय्यता निधी सुरु करत कोरोनासाठी आर्थिक मदत करण्याचा पर्याय सुरु केला आहे. परंतु तरीही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. सद्यच्या घडीला आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहचलो आहोत. त्यानुसार आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. आज राज्यात नवे 286 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहत. तसेच 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 जण पुणे आणि 3 जण मुंबईतील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत 300 रुग्णांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यामध्ये आजच्या 5 जणांचा सुद्धा समावेश आहे.(Coronavirus Hotspots in Maharashtra: महाराष्ट्रात जिल्हानिहाय जाणून घ्या 'हॉटस्पॉट्स'ची यादी; जिल्हा Red Zone, Green Zone कसा ठरतो?)

सात जणांचा मृत्यू झालेल्यांपैकी 5 जण हे पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. तसेच 4 जण हे 60 वयोगटातील आणि 3 जण हे 40-60 वयोगटातील होते. 7 पैकी 6 जणांची प्रकृती अधिक गंभीर म्हणजेच डायबिटिस, हायपरटेन्शन, अस्थमा आणि हृदयविकाराचे रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.(Coronavirus: मुंबईत आज कोरोनाचे नवे 107 रुग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण आकडा 2043 वर पोहचला) 

तर दुसऱ्या बाजूला भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 12759 वर पोहचला आहे. त्यामध्ये 420 जणांचा मृत्यू आता पर्यंत कोरोनामुळे झाला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता सरकार विविध नियमांचे अंमलबजावणी करत असल्याचे दिसून येत आहे. तर पीपीई किट आणि मास्क उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.