महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 118 रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याती एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3320 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवसांसाठी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या नियमाचे कठोर पालन केले जाणार असल्याचे ही सांगण्यात आले आहेत. जे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत ते पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. तसेच लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्राची ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर आता येत्या 20 एप्रिल पासून नॉन हॉटस्पॉट ठिकाणी सरकारकडून काही गोष्टी सुरु करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी येत्या 20 एप्रिल पासून आरोग्य, शेती आणि बागकाम, नारळ, काजू आणि मसाल्याची शेती, पशुसंवर्धन शेती, बँकेच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या सुरु होणार आहेत. मात्र या सेवा सुरु करण्यासाठी काही नियम सुद्धा असणार असून जर त्याच्या गैरफायदा घेतला जात असल्यास त्या गोष्टी पुन्हा बंद करण्यात येतील असे ही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.(Coronavirus: पुणे ते परभणी तब्बल 350 किमी पायी चालत गेलेल्या व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)
Maharashtra Govt lists select activities to be allowed in non-hotspots from Apr20- all health services, all agricultural&horticultural activities, operations of coconut,cashew&spice plantations, operation of animal husbandry farms, bank branches, ATMs, e-commerce companies etc.
— ANI (@ANI) April 17, 2020
दरम्यान, मुंबई-पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील जिल्हे ज्या प्रकारे विभागले आहेत त्यामध्ये, 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे केशरी झोनमध्ये आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट होतील. आता राज्यातील काही उद्योगांना पुनरुज्जीवन मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकार राज्यातील काही उद्योग सुरु करून, त्यांना दिलासा देण्याचा विचार करीत आहे.