Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

Coronavirus: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने सरकारसह विविध जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुढील आठ दिवसात कोरोनाची परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. अशातच आता परभणी (Parbhani) येथे विदर्भातील 11 जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Mumbai Local Trains: कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा बंद होणार लोकल? रेल्वेने दिले 'हे' स्पष्टीकरण)

परभणीतील स्थानिक प्रशासनाकडून आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कठोर पावले उचलली गेली आहेत. त्यानुसार विदर्भातील 11 जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवेश नाकारला असून पूर्व परवानगी घेतल्यानंतरत अत्यावश्यक सेवेसाठी मान्यता दिली जाणार आहे. त्याचसोबत अकोला शहरातून परभणीत जाणाऱ्या बसवर सुद्धा आज बंदी घातली गेली.

तर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा येथून परभणीत जाणाऱ्या आणि परभणीतून या 11 जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतूकीवर पूर्णपणे बंदी घातली गेली आहे. त्यामुळे अचानक स्थानिक प्रशानाने हा निर्णय घेतल्याने प्रवाशांना त्रास होतोयच पण याबद्दल आधीच कल्पना देणे आवश्यक होते असे सुद्धा नागरिकांकडून म्हटले जात आहे.(Night Curfew in Aurangabad: औरंगाबाद शहरात  संचारबंदी; 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल नाईट कर्फ्यू)

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा का अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत मुंबईत सुद्धा अचानक कोरोनाच्या  रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आता सरकारने नागरिकांना लॉकडाऊन नको असेल तर मास्क घाला असे आवाहन केले आहे.