Coronavirus In Mumbai: मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, 1034 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह
Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus In Mumbai: राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. अशातच सरकारकडून येत्या काही दिवसात या परिस्थिती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्याचसोबत नागरिकांना नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल अशा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ झाली आहे. तर आज 1034 रुग्णांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.(कोरोना व्हायरस म्हणजे नेमके काय? लक्षणे आणि खबरदारीचे उपाय घ्या जाणून)

शहरात गेल्या 24 तासात 712 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,02,232 जणांचा प्रकृती सुधारली आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर पोहचला असून एकूण 9315 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच कोरोनाच्या रुग्णांचा दुप्पटीचा दर 256 वर जाऊन पोहचला आहे. त्याचसोबत मुंबईत 25 फेब्रुवारी पर्यंत एकूण 32,30,798 ऐवढ्या कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या आहेत.(Viral Photo: काय चूक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची? मुंबई लोकलमध्ये मास्क डोळ्यावर ठेवून झोपलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर करत काँग्रेस नेत्याने केला सवाल)

Tweet:

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन  नाईट कर्फ्यू यांसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईतही लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहे. यावर बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केल आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास लॉकडाऊन होऊ शकतो, असे शेख म्हणाले.