कोरोना व्हायरस म्हणजे नेमके काय? लक्षणे आणि खबरदारीचे उपाय घ्या जाणून
Coronavirus Spread (Photo Credit: IANS)

मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरस (Corona Virus) 2 संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे. हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले असल्याची माहितीसमोर आली आहे. बुधवारी 22 जानेवारी रोजी कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे, तर संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चीनमध्ये आतापर्यंत 444 प्रकरणे नोदवली गेली आहेत. यामुळे मुंबईसारख्या शहरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणे (What is a Corona Virus)आणि खबरदारीचे उपाय जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

रुग्णाकडून घेतलेल्या या विषाणूचे नमुने प्रयोगशाळेत तपासले गेले आहेत. त्यानंतर चीनी अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना व्हायरल असल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरस अनेक प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- मुंबई मध्ये Novel Coronavirus चे 2 संशयित रूग्ण; कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये राखीव वॉर्ड

कोरोना व्हायरसची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय खालीलप्रमाणे-

हे एका विषाणूच्या समूहाचे नाव आहे. सध्या सर्दी, खोकल्यापासून ते गंभीर आजारासाठी हे विषाणू कारणीभूत असतात. सर्वसाधारणपणे हवेवाटे, शिकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून हा आजार जडला जातो. यामुळे प्रत्येकांनी आपला हात वारंवार आणि स्वच्छ धुवावे. शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावे. अर्धवट शिजवलेले कच्चे मांस खाऊ नये. श्वसनसंस्थेचे विकास असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना न होण्याची काळजी घ्यावी.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळीतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून इथेच त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत, असे मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.