Viral Photo: सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकलमध्ये मास्क डोळ्यावर ठेवून झोपलेल्या व्यक्तीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो नेटीझन्स शेअर करत असून त्यावर मजेशीर कमेन्ट करत आहेत. युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करत 'काय चूक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची?' असा प्रश्न विचारला आहे. याशिवाय मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीदेखील सत्यजीत तांबे यांची ही पोस्ट रिट्विट केली आहे. 'मित्रांनो असं बेजबाबदार वागू नका! मास्कचा योग्य वापर करा, कमीत कमी स्वतः च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकरिता,' असं म्हणत नागरिकांना आवाहन केलं आहे. (वाचा - Vijay Wadettiwar On Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? विजय वडेट्टीवार यांचे सूचक संकेत)
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात राज्यात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना संदर्भातील त्रिसुत्रीचं पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि सॅनिटाझरचा वापर करण्यासंदर्भात सरकार वारंवार सुचना देत आहे.
मित्रांनो असं बेजबाबदार वागू नका !
मास्क चा योग्य वापर करा , कमीत कमी स्वतः च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकरीता . https://t.co/0hrwlIw8uH
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 26, 2021
मात्र, तरीदेखील लोक घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणं टाळत आहेत. अशातचं आता मुंबई लोकलमध्ये मास्क डोळ्यावर ठेवून झोपण्याऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो शेअर करत अनेक नेत्यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा योग्य वापर करण्याचं आवाहन केलं आहे.