Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काल, 5  जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार, दिवसभरात कोरोनाचे 2436 नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 139 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार, आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण 80,229 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 42 हजार 215 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज दिली.राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. आज मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत.मुंबईच्या पाठोपाठ, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, या जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण दर दिवशी वाढत आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी खालील तक्ता पाहून जाणून घ्या.

प्राप्त माहितीनुसार, राज्यात सध्या कंटेनमेंट 3497 झोन क्रियाशील असून आज एकूण 18  हजार 26 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 69.18 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. कालपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा सुरु झाला. मात्र रेड आणि कंटेनमेंट झोन मध्ये अनेक उद्योग आणि व्यवसाय अजूनही बंद ठेवण्यात आले आहेत. राज्यातील कोणता जिल्हा रेड, ग्रीन, ऑरेंज झोन पैकी कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 46080 1519 18778
ठाणे 11877 292 4445
पुणे 9051 390 4893
औरंगाबाद 1781 90 1148
नाशिक 1367 81 978
रायगड 1362 55 704
पालघर 1285 37 468
सोलापुर 1217 94 572
जळगाव 896 109 374
अकोला 727 33 405
नागपुर 681 11 411
कोल्हापुर 630 6 303
सातारा 587 22 250
रत्नागिरी 344 10 129
अमरावती 275 16 164
हिंगोली 205 0 146
धुळे 195 21 102
अहमदनगर 188 8 76
जालना 170 3 78
नांदेड 162 7 102
यवतमाळ 160 2 104
सांगली 136 4 79
लातुर 132 4 83
उस्मानाबाद  106 3 53
सिंधुदुर्ग 105 0 17
बुलडाणा 82 3 48
परभणी 77 3 45
गोंदिया 68 0 50
बीड 51 1 38
गडचिरोली 41 0 25
नंदुरबार 40 4 28
भंडारा 38 0 14
चंद्रपुर 30 0 25
वाशिम 9 2 6
वर्धा 9 1 6
अन्य जिल्हे 65 18 0
एकुण 80229 2849 35147

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत नवे 9887 कोरोना रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,36,657 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 294 रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा 6642 वर पोहोचला आहे. सद्य घडीला देशात 1,15,942 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,14,073 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.