Coronavirus: मुंबईकरांसाठी Corona Vaccine जागतिक पातळीवरुन खरेदीसाठी BMC कडून विचार सुरु- आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

मुंबईतील कोरोना लसीकरण (Corona Vaccine) वेगाने वाढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी मुंबईचे पालकमंत्री (उपनगर) म्हणून चर्चा केली. या वेळी पुरेशी लस उपलब्ध होण्यासाठी कोरोना लसीच्या जागतीक खरेदीबाबत काही करता येते का याबाबत विचार झाला, अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि मुंबईचे पालकमंत्री (Guardian Minister of Mumbai) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. कोरोना लसीकरणासाठी लसीकरण केंद्र वाढविण्याचे आमचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. मुंबई महापालिकेतील प्रत्येक वॉर्डात एक कोरोना लसीकरण केंद्र असेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ही केंद्र लवकर सुरु व्हावीत, अशी विनंतीही आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना केली आहे.

दरम्यान, काही लोक टेक्नोसॉव्ही नसतात. त्यामुळे त्यांना कोविन अॅपद्वरे कोरोना लसीसाठी नोंदणी करता येत नाही. जे लोक कोविन अॅप योग्य आणि वेगाने हाताळू शकतात त्यांना वेळेत प्रवेश मिळतो. ज्यांना असे करता येत नाही ते मागे राहतात. त्याच्यासाठी आम्ही एक प्रणाली राबविण्याच्या विचारात आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबई महापालिकेतील प्रत्येक वॉर्डात एक कोरोना लसीकरण केंद्र असेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ही केंद्र लवकर सुरु व्हावीत, अशी विनंतीही आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना केली आहे.)

मुंबई महापालिकेने सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरणासाठी काही मार्गदर्सक सूचना जारी केल्या आहेत. मी महाराष्ट्रातील इतर सर्व शहरांना विनंती करतो की त्यांनी 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना त्यांच्या सोयीसाठी आणि आरामदायी पद्धतीने लसीकरण करण्यासाठी मोहीम सुरु करावी असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरमयान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईकरांसाठी महापालिका कोरोना लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी लवकरच एक जागतिक टेंडर काढून कोरोना लस खरेदी करता येते आहे का, याबाबत चर्चा सुरु असल्याचे महापोल पेडणेकर यांनी म्हटले आहे.