
पुणे (Pune) जिल्ह्यातील एका महिलेच्या चुकीमुळे 25 गावांतील 81 ग्रामस्थांचं विलगीकरण (Quarantine) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला अंगणवाडी सेविका असल्याची प्राथमिक माहिती आहे. या महिलेने नवी मुंबई (Navi Mumbai) येथील वाशी ते पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असलेल्या वरसंगांव असा प्रवास केला. या महिलेमध्ये कोरोना व्हायरस ( Coronavirus) लक्षणे आढळली होती. असे असतानाही तिने प्रवास करण्याचा वेडेपणा केला. ज्यामुले प्रशासन आणि ग्रामस्थ दोन्ही कामाला लागले आहेत.
या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही महिला अंगणवाडी सेविका आहे. तिच्या कोरोना व्हायरस लक्षणे आढळली होती. आता तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तिची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला मुळची पुणे येथील रहिवासी आहे. काही कामासाठी ती पानशेत धरणानजीक असलेल्या वरसगाव येथे प्रवास केला. या महिलेने केलेल्या प्रवासाचे अंतरही खूप आहे.'
या महिलेने नेमका कोणकोत्या ठिकाणी प्रवास केला. तिथे ती कोणाकोणाला भेटली. तिच्यापासून कोणाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे काय? याबाबत तपास सुरु आहे. असेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यन, घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही पूर्वकाळजी घेत आहोत. त्यासाठीच आम्ही एक कंटेटमेंट झोन तयार केला आहे. अर्थात हे क्षेत्रव बाधित नाही. तरीही कोणतीही धोका न पत्करता या नागरिकांची चाचणी सुरु आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. एका वृत्तवाहिनीच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Coronavirus: लॉकडाऊन काळात काय करावे, करु नये?)
दरम्यान, धक्कादायक असे की, या महिलेच्या निष्काळजीपणामुळे जवळपास 48 ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारी गावं तपासली जात आहेत. त्या गावांतील सुमारे 81 नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या 81 नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइन असे शिक्के मारण्यात येत आले आहेत. या सर्व नागरिकांना घरीच बसण्यास सांगितले असून, एक वैद्यकीय पथक त्यांच्यावर नजर ठेऊन आहे.