Avadhoot Gupte, Prime Minister Narendra Modi | (Photo credit: archived, edited, symbolic images)

जनतेला उद्देशून केलेल्या भाषणातील घोषणा ऐकली आणि आपल्याला देशभक्तीने गहिवरुन आलं अशी भावना गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन (Lockdown) या पार्श्वभूमीवर आज (14 एप्रिल 2020) देशाला संबोधित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे 2020 पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. तसेच, कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढण्यासाठी देश सुसज्ज असल्याचेही म्हटले. दरम्यान, हे भाषण ऐकून आपल्याला गहिवरुन आल्याची भावना गायत अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली आहे.

अवधूत गुप्ते यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

अवधूत गुप्ते यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘आज आपला देश एक लाख बेड्सच्या सहाय्याने करोनाशी लढण्यासाठी सुसज्ज आहे. मा. पंतप्रधानांनी घोषणा केली आणि ती ऐकून देशप्रेमाने गहिवरून आलं. दररोज..प्रत्येक क्षणी हे सिद्ध होतंय. सारे जहाँ से अच्छा, हिंदोसताँ हमारा..जय हिंद!’ (हेही वाचा, Coronavirus: अभिनेता शाहरुख खान याच्याकडून महाराष्ट्राला 25,000 PPE Kits; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मानले आभार)

अवधूत गुप्ते ट्विट

दरम्यान, देशातील जनता एखाद्या सैनिकाप्रमाणे कोरोना व्हायरस संकटाविरुद्ध लढत आहे. या काळात जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. पण तरीही प्रत्येक भारतीयाने कर्तव्यपालन करत संयमाने आपला लढा कायम ठेवला आहे. जगामध्ये कोरोना व्हायरस संकट किती भयान आहे याची सर्वांनाच प्रचिती आली आहे. मात्र, या संकटाचे भारताला तितके नुकसान झाले नाही. ही आनंदाची बाब आहे. भारताने योग्य वेळी योग्य पावले उचलल्यानेच हे घडू शकले अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी भाषणादरम्यान व्यक्त केली होती.