प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांचा  (Coronavirus) आकडा दिवसागणिक वाढला आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच राज्यात पुढील काही दिवस लॉकडाउन कायम राहणार असून नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तरीही नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. तर आता महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा आकडा 6427 वर पोहचला आहे. तसेच 778 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार रेड झोनमधील नियम शिथिल करण्यात येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहेत. तसेच कन्टेंटमेंट झोनमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी नाही आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. मात्र नियमांचे उल्लंघन नागरिकांकडून केले जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होत आहे. तर आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजाराच्या पार गेला आहे. तर 840 जणांचा आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.(महाराष्ट्र: औरंगाबाद मधील सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित आई, नवजात बाळाची व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून घडवली भेट)

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 21700 वर पोहचला असून 686 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. देशात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. मात्र आता 3 मे नंतर सरकार देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनच्या आदेशाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.