कोरोना व्हायसस (Coronavirus) बाधीत रुग्णांचा आकडा आता 26 वरुन थेट 31 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना व्हायरस बाधित आणखी 5 नवे रुग्ण शनिवारी (14 मार्च 2020) आढळून आले. या पाचही रुग्णांची सीओव्हीआयडी-19 (COVID 19) पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. हे पाचही रुग्ण पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील आहे. त्यामळे पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरोना बाधित एकूण रुग्णांची संख्या आता 15 इतकी झाली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या आणि शहर
राज्यातील असलेल्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या शहरनिहाय पाहता ती, पुणे – 15, मुंबई – 5, ठाणे – 1, कल्याण – 1, नवी मुंबई – 2, अहमदनगर – 1, नागपूर – 4, यवतमाळ – 2 अशी आहे.
कोणत्या दिवशी कोठे आढळले कोरोना व्हायरस रुग्ण?
दरम्यान, महाराष्ट्रात आढळेल्या कोरना व्हायरस रुग्णांचा तपशील क्रमानुसार पाहिला तर, पुणे शहरात प्रथम एका दाम्पत्याला कोरोना व्हायर संसर्ग झाल्याची घटना 9 मार्च रोजी उघडकीस आली. या दाम्पत्यातील पती पत्नी दोघांनी कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले. पुढे या दाम्पत्याच्या एका मुलीलाही हा संसर्ग झाल्याचे 10 मार्चला पुढे आले. तर त्याच दिवशी (10 मार्च) याच दाम्पत्याचा पुण्यातील नातेवाईक आणि त्यांचा टॅक्सी चालक अशा दोघांना कोरोना व्हायरस झाल्याची पुष्टी झाली. (हेही वाचा, Coronavirus: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून कोरोना व्हायरस संशयीत 3 रुग्ण पळाले, तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल)
एएनआय ट्विट
Public Health Department, Maharashtra: 5 more people found positive in Pimpri-Chinchwad today taking total tally of positive cases in Pune to 15. Maharashtra state tally reaches 31. #Coronavirus
— ANI (@ANI) March 14, 2020
कोरोना बाधितांचा आकडा 31 वर
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 'त्या' दाम्पत्याच्या 2 सहप्रवाशांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे 11 मार्च या दिवशी पुढे आले. त्यानंतर नागपूर (1) – 12 मार्च, पुणे (1) – 12 मार्च,,पुणे (3) – 12 मार्च, ठाणे (1) – 12 मार्च, मुंबई (1) – 12 मार्च, नागपूर (2) – 13 मार्च, पुणे (1) – 13 मार्च, अहमदनगर (1) – 13 मार्च, मुंबईत (1) – 13 मार्च, नागपूर (1) – 14 मार्च, यवतमाळ (2) – 14 मार्च, मुंबई (1) – 14 मार्च, वाशी (1) – 14 मार्च, पनवेल (1) – 14 मार्च,कल्याण (1) – 14 मार्च तर पिंपरी चिंचवड येथे आजच्याच दिवशी म्हणजेच 14 मार्चला 5 जणांना कोरोना व्हायरस बाधा झाल्याचे पुढे आले. अशा प्रकारे राज्यात या क्षणाला एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.