Coronavirus: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून कोरोना व्हायरस संशयीत 3 रुग्ण पळाले, तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) झाल्याचा संशय असलेले 3 रुग्ण पळाल्याची घटना अहमदनगर जिल्हा रुग्णालय (Ahmednagar District Hospital) येथे घडली आहे. तोफखाना पोलीस स्टेशन (Tofkhana Police Station) दप्तरी या धक्कादायक प्रकाराबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, हे रुग्ण कोठे आढळल्या पोलिसांशी त्वरीत संपर्क करावा असे अवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस (COVID 19) नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार जंग जंग पछाडत आहे. त्यासाठी नागरिकांनाही विविध सूचना दिल्या जात आहेत. अवाहन केले जात आहे. असे असतानाच अशी घटना घडणे हे काहीसे विचित्र असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून कोरोना व्हायरस लागण झाल्याचा संशय असलेले रुग्ण पळाल्याची ही राज्याती दुसरी घटना आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिणीने याबाबत वृत्त दिले आहे. या आधी नागपूर येथील मेयो रुग्णलयात उपचार घेत असलेले पाच संशयीत रुग्ण पळाले होते. या घटनेमुळेही एकच खळबळ उडाली होती. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. पळालेल्या सर्व रुग्णांना हॉस्पिटलमध्ये एका विशेष कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान, याच वॉर्डात एक कोरना बाधित रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि घाबरुन गेलेल्या रुग्णांनी कक्षातून पळ काढला. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रातील सर्व मॉल 31 मार्च पर्यंत बंद, COVID 19 नियंत्रणासाठी राज्य सरकारचा निर्णय- राजेश टोपे)

पळालेलेले पुन्हा परतले

दरम्यान, रुग्णालयातून पळालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने संपर्क केला. त्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत हे सर्व चारही रुग्ण पुन्हा रुग्णालयात परतले. त्यानंतर कोरना व्हायरस नियंत्रण हे केवळ रुग्णलय आणि पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करुन होणार नाही. तर, त्यासाठी नागरिकांनीही मनापासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे अवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.