Coronavirus: महाराष्ट्रातील सर्व मॉल 31 मार्च पर्यंत बंद, COVID 19 नियंत्रणासाठी राज्य सरकारचा निर्णय- राजेश टोपे
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व शहरांतील मॉल्स 31 मार्च पर्यंत बंद (Malls Closed In Maharashtra) ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, मॉल बंद (Malls In Maharashtra) असतील तरी राज्यातील किराणा माल दुकाने सुरु राहणार आहेत. जेणेकरुन नागरिकांना अन्नधान्य आणि जिवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील.

महाराष्ट्र आज कोरना व्हायरसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पायरीवर आहे. या व्हायरसने पुढची पायरी गाठली जाऊ नये यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहे. कोरोना व्हायरसने जर पुढची पायरी गाठली तर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. ते आटोक्यात आणण्यासाठी मग आणखी तीव्र पर्यायांचा विचार करावा लागू शकेल. जसे की, हुवान आणि सिंघापूर हे शहर पूर्णपणे 'लॉकडाऊन' करण्यात आले. महाराष्ट्रात असे काही पाऊल उचलावे लागू नये. किंबहून तशी वेळच येऊ नये यासाठी राज्य सरकार जंग जंग पछाडत आहे.

वरील पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सिनेमागृह, व्यायामशाळा, तरणतलाव, शाळा आणि आता महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील शाळा 15 ते 31 मार्च या कालावधीत बंदर राहणार आहेत. यासोबतच मुंबई उच्च न्यायालयानेही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे हे आदेश नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठालाही लागू असणार आहे. गोवा येथील न्यायालयही बंद असणार आहे. (हेही वाचा, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर)

एएनआय ट्विट

दरम्यान, राज्यातील नागरिकांनीही राज्य सरकारचे आदेश आणि अवाहनाचे पालन करणे आवश्यक आहे. जेनेकरुन आपले हात वारंवार स्वच्छ धुणे. गर्दीतील आपला सहभाग टाळणे. शाळांना सुट्ट्या असल्या तरी मुलांना सोबत घेऊन सहल, प्रवास टाळणे. मुले उद्यानात खेळत असतील तर दोन मुलांमध्ये किमान 6 फुट इतके अंतर राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच, मोठ्या व्यक्तींनी प्रवास करताना तोंडाला रुमाल बांधणे, कोरोना व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात न येणे. जर कोरोना व्हायरसची लक्षणे स्वत:त आढळली तर स्वत: हून कुटुंब आणि समाजापासून वेगळे राहणे या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व सूचना राज्य सरकार आणि आरोग्य विभागानेच दिल्या आहेत.