Coronavirus: जळगाव येथे आणखी 2 रुग्ण आढळले; जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 237 वर
COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण भारताला कोरोना विषाणूने (Coronavirus) हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यातच महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कोरोना आणखी 2 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात जोशी पेठेतील एका महिलेचा तर, जिल्हा पेठेतील एका पुरूषाच्या समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 237 वर पोहचली आहे. राज्यात कोरोना विषाणूचे जाळे दिवसेंदिवस पसरत चालले आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जीवापाड प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात आतापर्यंत 29 हजार 100 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 564 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा-महाराष्ट्र: औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या पार

ट्वीट-

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सुरुवातीला खूप कमी संख्येत कोरोनाबाधित आढळून आले होते. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 237 पोहचली आहे. यापैकी 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 46 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.