महाराष्ट्र: औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या पार
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना लॉकडाउनच्या काळात नियमांचे पालन करण्यासोबत घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे कोरोनाच्या विखळ्यात सापडले असून दिवसेंदिवस तेथे कोरोनाचा नवा रुग्ण आढळून येत आहे. मुंबई आणि पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आता औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून तो आता 800 च्या पार गेला आहे. तसेच रात्रीहून आतापर्यंत 30 नवे रुग्ण आढळून आले असून 32 जणांना बळी गेला आहे. त्यामुळे औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 872 वर पोहचला आहे.

महाराष्ट्रातील एकूण 13 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रेड झोनच्या क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. तसेच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आले असून तेथे काही गोष्टींना परवानगी दिली आहे. परंतु त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगसह नियमांचे पालन करणे सुद्धा अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने राज्याअंतर्गत उद्योगधंदे सुरु करण्याची परवानगी सुद्धा दिली आहे. तर कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत.(Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित तुमच्या शहरात COVID19 चे किती रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घ्या)

 दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 29100 वर पोहचला असून 21470 वर अद्याप उपचार सुरु आहेत. तसेच 1068 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटर आणि आयसोशलन सेंटर्स उभारण्यात येत आहेत. राज्यातील कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता त्याबाबत नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.