Shiv Sena MLA Disqualification Case: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे गटातील आमदारांची संपूर्ण यादी, अपात्रता याचिकांवर विधानभवनात सुनावणी सुरु
Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited)

MLAs List Of Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुनावणी घेत आहेत. राज्याच्या विधानभवन परिसरात सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Faction MLA) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde Faction MLA) अशा दोन्ही गटाचे अनुक्रमे 14 आणि 40 आमदार उपस्थित आहेत. आज (14 सप्टेंबर) दुपारी 12 वाजलेपासून सुनावणीस सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूचे आमदार आपल्या वकिलांसह बाजू मांडू शकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्व (34) याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेतली जाणार आहे. आपण येथे जाऊन घेऊ शकता ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांची संपूर्ण यादी. जे या सुनावणीसाठी उपस्थित आहेत.

अपात्रता नोटीस प्राप्त उद्धव ठाकरे गटाचे आमदार

अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावंकर, प्रकाश फातर्फेकर, कैलास पाटिल, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत, राहुल पाटील

अपात्रता नोटीस प्राप्त एकनाथ शिंदे गटाचे आमदार

एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थत आहेत. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली आहे की, सुनावणी पूर्ण करुन आजच निर्णयही द्यावा. मात्र, विधानसभा अध्यक्ष खरोखरच असे करतात की निर्णय राखून ठेवतात की, सुनावणीच लांबते याबाबत उत्सुकता आहे.