CM Of Maha | Twitter

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पत्रकार परिषदेदरम्यानचा एक व्हिडिओ काल दिवसभर सोशल मीडीयामध्ये वायरल होत होता. या व्हीडिओ वरून विरोधकांनीही सरकार वर हल्लाबोल केला होता. आज मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा दिला आहे. दरम्यान वाक्याचा शेंडा आणि बोडका काढून मधलंच वाक्य वायरल झाल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

"बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!" इतकीच क्लिप वायरल झाल्याने अनेकांमध्ये त्याबाबत समज-गैरसमज झाले. पण मुख्यमंत्र्यांनी आज बोलताना 'आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत बैठका घेत होतो. त्यामुळे प्रश्न-उत्तरं न घेणं, राजकीय भाष्य किंवा इतर गोष्टी न घेता केवळ आरक्षणाबाबत काय झालं ते बोलून निघणं' असा आमचा उद्देश होता. परंतू ते चूकीच्या मेसेज सह वायरल केले झालं आहे.

मीडीयाशी बोलताना त्यांनी तुमच्यावर आमचा विश्वास असतो पण हा घात असं मिश्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. परंतू आंदोलन स्थळी मराठा समाजाला संबोधताना त्यांनी आपण मनात एक पोटात एक ठेवणारा व्यक्ती नाही. माझ्याकडून, सरकारकडून सकल मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी पुन्हा दिली आहे.

काय होता वायरल व्हिडिओ

दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांचं मागील 17 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस देऊन त्यांनी मागे घेण्यास भाग पाडलं आहे. आता सरकारला जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे.