Photo Credit- X

Mumbai Metro Line 3: मुंबईची भूमिगत मेट्रो 3 च्या लाईनचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे दरम्यानचा पहिला टप्पा या वर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकतो. एमएमआरसीने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रलंबित इलेक्टिक्स आणि प्लंबिंगमुळे फेज 1 ला बिलंब झाल्याचं एमएमआरसीने सांगितलं. संपूर्ण मेट्रो लाईन सप्टेंबरमध्ये सुरू होणार होती तर फेज 1 जूनमध्ये सुरू होणार होता.असं त्यांनी सांगितलं आहे.(हेही वाचा:Mumbai Metro 3: अखेर 6 वर्षानंतर लवकरच सुरु होणार मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा; दुसऱ्या टप्प्याच्या ट्रायलचे कामही प्रगतीपथावर)

मात्र प्रलंबित कामांमुळे विलंब झाल्याचं सांगण्यात आलं. 55मिनिटांमध्ये कुलाबा ते आरे मेट्रो असा प्रवास करता येणार आहे. एकूण 27 स्थानक या मार्गामध्ये असणार आहेत. 33.5 किमीचा हा प्रवास असेल. दररोज 17 लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील असा अंदाज आहे. सकाळी 6.30 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे तर रात्री 11 वाजता शेवटी मेट्रो असणार आहे. सीएसएमटी वर चर्चगेट महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनला ही मेट्रो जोडली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई विमानतळाला देखील ही मेट्रो जोडणार आहे. तर मुंबईच्या रस्त्यावरील 6 लाख वाहनं कमी होण्याचा अंदाज आहे.