महाराष्ट्रात SII च्या COVID 19 vaccine चे लसीकरण, वितरण कशा पद्धतीने व्हावं यासाठी टास्क फोर्स ची स्थापना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची PM नरेंद्र मोदींना माहिती
CM Uddhav Thackeray| Photo Credits: CMO Maharashtra

भारताचे पंताप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक बोलावली होती. यामध्ये सुरूवातीला सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा भेट झाली. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश होता. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्हीसीद्वारा माहिती देताना लसीकरणाबाबतही अपडेट्स दिले आहे. सध्या सातत्याने सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांच्यासोबत संपर्कात असल्याची तसेच महाराष्ट्रात SII च्या COVID 19 vaccine चे लसीकरण, वितरण कशा पद्धतीने व्हावं यासाठी टास्क फोर्स ची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट मध्ये कोविड 19 लसीचं डोस बनवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनवण्यात येणार्‍या लसीचं उत्पादन सीरम कडे आहे. भारतामध्ये सीरम इन्स्टिट्युट स्वतंत्रपणे कोविशिल्ड या लसीसाठी मानवी चाचण्या करत आहे. त्याचे आहवाल पुढील काही महिन्यात हाती येतील.

CMO Tweet

कोविशिल्ड लस सरकारला 250 रुपये प्रती डोस तर फॉर्मासिस्टना 1000 रुपये प्रती डोस अशा किंमतीमध्ये उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती कालच सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी केंद्र सरकार कोविशिल्ड लसीचे (Covishield Vaccine) 90% डोस खरेदी करणार असल्याचंदेखील सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात सीरम इन्सिट्युटला भेट देऊ शकतात असे वृत्त काही मीडिया रिपोर्ट्सद्वारा समोर आले आहे मात्र त्याला पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.