मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्यावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार स्थापन होवून महिना उलटून गेला तरी मंत्रीमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झाला नाही आणि मुख्यमंत्र्यांसह (CM) उपमुख्यमंत्री (Deputy CM) दोघांनीचं मिळून 700 हून अधिक जीआर (GR) काढले आहेत. तरी मंत्रीमंडळाचा मुहूर्त कधी असा सवाल अजित पवारांनी शिंदे सरकारवर उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात सरकार (Maharashtra Government) होऊन आता महिना पूर्ण झाला तरीही खातेवाटप झालेलं नाही, हे 'एक दुजे के लिए' असे दोघांचेच सरकार असल्याची खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अखेर मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा केली आहे. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) ते बोलत होती. विरोधीपक्ष नेते प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले सरकारमध्ये दोघचं असलो तरी काम व्यवस्थित सुरु आहे. आम्ही पेट्रोलचे (Petrol) दर कमी केलेत, वीजेच्या (Electricity) दरात कपात केली, पूग्रस्त (Flooded Region) भागात जावून स्वत शेतकऱ्यांची चौकशी केली. दोघांचं सरकार असलं तरी आम्ही कुठेही कमी पडलो नाही आणि राहीला प्रश्न मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा तर राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार अशी घोषणा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ( हे ही वाचा:-Maharashtra Politics: मंत्रीमंडळाच्या विस्तारावरुन अजित पवारांसह सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल)
राज्यात नवीन सरकार स्थापन होवून एक महिना पूर्ण झाला तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही निघालाचं नाही. फक्त राज्याची जनताचं नाही तर भाजपातील (BJP) आमदारासह शिंदेगटातील आमदार देखील मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. शिंदे सरकारवर मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्दयावरुन दररोज विरोधकांकडून ताशेरे ओढले जातात. तरी राज्यात मंत्रीमंडळाचं भिजत घोंगडचं आहे. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघं मिळून संपूर्ण राज्याचा कारभार बघत आहेत. तरी आज मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आता लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल अशी महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे.