नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाव दत्तक घेत केला विकास पण नोकरीवरुन स्थानिकांनी घेरले
Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावाला दत्तक घेतले होते. त्यानुसार फडणवीस यांनी या गावाचा कायापालट करत जबरदस्त विकास केला. यासाठी जवळजवळ सकारकडून विकास कार्यासाठी 18 करोड रुपयांचा खर्च केला. गावात नवे ग्रामपंचायतीचे शानदार ऑफिस, सांस्कृतिक केंद्र, नवे जिल्हा परिषद शाळा, वॉटर सिस्टिम यांसारख्या विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.

मात्र फेटरी गावात विकास जरी झाला असला तरीही नोकरीचा प्रश्न कायमच आहे. त्यामुळे नागरिकांनी नोकरीवरुन देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. गावातील तरुण नोकरी न मिळाल्याने त्रस्त आहेत. स्थानिक रहिवाशी दीप्ती लांगडे एक इंजिनिअर आहे. तिने तीन वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले तरीही अद्याप नोकरी लागलेली नाही असे म्हटले आहे. गावातील जवळजवळ 60-70 टक्के तरुणवर्ग बेरोजगार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या गावातील तरुणांना नोकरी मिळावी अशी मागणी केली जात आहे.(नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: नागपूर दक्षिण-पश्चिम ते नागपूर मध्य चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून)

फेटरी गावाची 2011 मध्ये लोकसंख्या 2700 होती परंतु आता ती 4500 वर पोहचली आङे. ग्रामपंचायतीला पाणी आणि प्रॉपर्टी टॅक्सच्या बदल्यात वर्षाला 27 लाख रुपयांचा महसूल देण्यात येतो. गावात लाखो रुपये खर्च करुन वाचनालय बनवले आहे. पण नोकरीसंदर्भात येथे अजूनही अनिश्चितीतचे वातावरण आहे.

तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या विदर्भात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजप आणि शिवसेनेने येथे शिरकाव केला आणि येथील राजकारणाची समीकरणं बदलून टाकली. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांचा भरघोस मतांनी विजय झाला इतकेच नव्हे तर तर मुख्यमंत्रीपदावर विराजमानही झाले.