paraglides | pixabay.com

शहरांमध्ये आज काल  ट्राफिक ही समस्या अटळ आहे. सातार्‍यामध्ये एका विद्यार्थ्याने चक्क ट्राफिक टाळण्यासाठी पॅराग्लायडिंग (Paragliding) चा पर्याय निवडला आणि तो पेपरला पोहचला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. सातार्‍यातील वाई तालुक्या मध्ये  पसरणी गावात समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर पोहोचायला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना हा धाडसी निर्णय घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये समर्थ त्याच्या परीक्षा केंद्राजवळ उतरण्यापूर्वी आकाशात झेपावताना, कॉलेजची बॅग ओढताना दिसत आहे. परीक्षेला अवघी 15-20 बाकी असताना दारात संपूर्ण पॅराग्लायडिंग गियर घालून त्याला पाहून सारेच चकित झाले होते.

रिपोर्ट्सनुसार, समर्थ त्यांच्या परीक्षेच्या दिवशी वैयक्तिक कामासाठी पाचगणीमध्ये गेला होता. वाई-पांचगणी रस्त्यावर तो प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकणार हे लक्षात आल्याने त्याने रोजचा मार्ग सोडला आणि पॅराग्लायडिंग करण्याचा निर्णय घेतला.

पॅराग्लायडिंग करून पेपरला निघाला तरूण 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by Insta | सातारा ⭐️ (@insta_satara)

Adventure sports expert गोविंद येवळे आणि त्यांच्या पाचगणी येथील GP Adventure च्या टीमने त्यांच्या महाविद्यालयाजवळ सुरक्षित लँडिंगची खात्री करून उड्डाणाची व्यवस्था केली. इंस्टाग्राम वर 'Insta_Satara' वरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

समर्थ महांगडेच्या या अजब प्रवासाने नेटिझन्सना आश्चर्यचकित केले आहे. अनेकांनी त्याच्या quick thinking ची  प्रशंसा केली आहे, तर काहींनी साहसी खेळांशी संबंधित सुरक्षिततेच्या जोखमींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.