
Maha Kumbh Mela Special Trains: नवी दिल्लीत (New Delhi) शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पाश्वभूमीवर उत्तर रेल्वेने मोठी निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभमेळ्यादरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने 4 महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्या (Maha Kumbh Mela Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते.
महाकुंभासाठी चालवण्यात येणार 'या' चार रेल्वे गाड्या -
- ट्रेन क्रमांक- 04420 19.00 वाजता- नवी दिल्ली ते प्रयागराज जंक्शन मार्गे नवी दिल्ली-गाझियाबाद-मुरादाबाद-बरेली-लखनऊ-रायबरेली जंक्शन-फाफामऊ जंक्शन. (Lalu Prasad On Mahakumbh: ‘कुंभमेळा अर्थहीन आहे’; लालू प्रसाद यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद, नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीसाठी रेल्वेला धरले जबाबदार)
- ट्रेन क्रमांक-04422 21.00 वाजता – नवी दिल्ली ते प्रयागराज जंक्शन मार्गे नवी दिल्ली-गाझियाबाद-मुरादाबाद-बरेली-लखनऊ-रायबरेली-फाफामऊ जंक्शन.
- ट्रेन क्रमांक- 04424 20.00 वाजता - आनंद विहार टर्मिनल ते प्रयागराज जंक्शन. गाझियाबाद-मुरादाबाद-बरेली-लखनऊ-रायबरेली-फाफामऊ मार्गे.(हेही वाचा -New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर)
- ट्रेन क्रमांक -04418, सुटण्याची वेळ 15:00 वाजता – नवी दिल्ली – दरभंगा जंक्शन.
For the convenience of the rail passengers and to clear extra rush during Maha Kumbh Mela, Railways have decided to run 4 Maha Kumbh Mela Special trains: Northern Railway pic.twitter.com/5hK4sOf4SH
— ANI (@ANI) February 16, 2025
दरम्यान, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, काही प्रवासी पादचारी पुलावरून उतरताना घसरले आणि इतर प्रवाशांवर पडले. प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर प्रवाशांची मोठी गर्दी जमली असताना ही दुर्दैवी घटना घडली.