BJP च्या कार्यक्रमात Duplicate Big B ची हजेरी, नागपूरकरांमध्ये भाजप आमदाराच हसं
अमिताभ बच्चन (Image Credit: Stock Photo)

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'झुंड (Zund Marathi Movie) या नागराज मंजुळे (Nagraj Manjule)  दिग्दर्शित चित्रपटाच्या शूटींगमध्ये वस्त आहेत. या दरम्यान त्यांनी कोणाला ही भेटण्यासाठी वेळ दिलेला नाही. मात्र नागपूरात भाजप पक्षाचे आमदार सुधाकर कोहळे यांनी डुप्लिकेट बिग-बी यांना त्यांच्या कार्यक्रमात सादर केले. या प्रकारामुळे कोहळे यांचे नागपुरकरांमध्ये हसं झाले आहे.

नागपूर (Nagpur) मध्ये राहणाऱ्या लोकांना खऱ्या बिग-बी यांना भेटायचे आहे. मात्र शूटींगमध्ये वस्त असलेल्यामुळे त्यांनी कोणालाही भेटण्यासाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे सीएम चषकाच्या (CM Chashak) कार्यक्रमासाठी भाजप आमदाराने वेगळीच शक्कल लढवत डुप्लिकेट बिग बी यांना मंचावर आणून उभे केल्याचा प्रकार घडला आहे.

तर या क्रीडा स्पर्धेच्या समारोपच्या वेळी खोट्या बच्चन यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कोहळे यांनी ही चांगलीच शक्कल लढवून डुप्लिकेट बिग बी यांची नागरिकांना भेट घालून दिली.