Jalgaon Atarwal Village (Image Credit - ANi Twitter)

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात शनिवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर तब्बल 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जळगाव जिल्ह्यातील अट्रावल गावात अज्ञात व्यक्तींनी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली." पोलिसांनी पुढे सांगितले की परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि चकमकीच्या संदर्भात 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान गावामध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले मिळाले. पोलिसांनी त्या ठिकाणी तत्काळ कारवाई करत दुसरा पुतळा बसवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

यापूर्वी 30 मार्च रोजी, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एका मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या संदर्भात 56 जणांना अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी एएनआयला सांगितले.जळगावचे पोलीस अधीक्षक म्हणाले की, दोन एफआयआर नोंदवण्यात आले असून सध्या परिस्थिती शांततापूर्ण असून परिसरात नियंत्रणात आहे.