समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी(Abu Azmi) यांना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'लिव्ह इन रिलेशनशिप (Live-in Relationships) म्हणजे सोबत राहणं फक्त...तो शरीरसंबंधांचा परवाना नाही' अशा शब्दांत अबू आजमीयांना प्रत्युत्तर देताना 'लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते', असे कायद्याचे स्मरणही चित्रा वाघ यांनी आझमी यांना करुन दिले आहे. त्यासोबतच 'स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार?', असा टोलाही वाघ यांनी लगावला आहे.
अबू आजमीकाय म्हणाले होते?
अबू आजमी यांनी देशातील कायद्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत तो चुकीचा असल्याचे म्हटले होते. लग्न न करता कुठलीही स्त्री व्यक्तीसोबत राहू शकते. याला लिव्ह इन रिलेशन म्हणतात. .. व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? देशातील कायदाच चुकीचा आहे. तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत राहू देता. कोणताही गुन्हा दाखल होत नाही. लिव्ह इन रिलेशनमध्ये एक-दोन वर्षे राहिल्यानंतर मग नंतर सांगितले जाते माझा बलात्कार झाला म्हणून. अबू आझमी यांनी अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली होती.
चित्रा वाघ यांनी काय म्हटले?
अबू आजमी यांना प्रत्युत्तर देतना चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'लिव्ह इन ...म्हणजे सोबत राहणं फक्त...तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आजमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? (हेही वाचा, Abu Azami On Live in Relationship: काही महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला - अबू आझमी)
लिव्ह इन ...म्हणजे सोबत राहणं फक्त...तो शरीरसंबंधांचा परवाना नाही
अबू आजमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते
स्वतःला बायकोचे *मालक* समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? pic.twitter.com/mWZumninMZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2021
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनीही राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. सध्या बरेच राजकीय नेते महिलांची बदनामी करत आहेत. कारण अनेक नेते बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यामुळे ते महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे अडचणीत आलेल्या राजकीय नेत्यांना वाचविण्याचा हेतू असल्याचेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.