मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय राज्यसेवेत असलेल्या डॉक्टर्स संबंधी आहे. सरकारी निर्णयानुसार राज्यातील बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या (Bonded Doctors) मानधनात मोठी वाढ करण्यात येणार आहे. तसेच, कंत्राटी डॉक्टर्सचे (Contract Doctors) आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईला आणि डॉक्टर्सनासुद्धा यामुळे निश्चितपणे बळ आणि प्रोत्साहन मिळणार, असल्याची भावना ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
किती होणार पगारवाढ?
सरारच्या निर्णायानुसार आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना 60 हजारांच्याऐवजी 75 हजार रुपये, आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टर्सना 70 हजारऐवजी 85 हजार, इतर भागातील MBBS डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार रुपये मानधन. तसेच, इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रु. मानधन मिळणार आहे. (हेही वाचा, राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत 30 मे रोजी निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा)
ट्विट
✅ आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना ६० हजारांच्याऐवजी ७५ हजार रुपये
✅ आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजारऐवजी ८५ हजार
✅ इतर भागातील MBBS डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार रुपये मानधन.
✅ इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रु. मानधन मिळणार pic.twitter.com/v0CcyP92oA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 29, 2020
ट्विट
बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला जाहीर. कोरोनाविरुद्धच्या लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार; डॉक्टर्सनासुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार. pic.twitter.com/Qkzd9GmdOE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 29, 2020
राज्यातील कोरना संकटात डॉक्टर्स आणि वैद्यकीय विभागात काम करणारे कर्मचारी आपले प्राण धोक्यात घालून काम करत आहेत. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत आपणासही कोरोना व्हायरस संक्रमन होऊ शकतो. हे माहित असूनही डॉक्टर आपले कर्तव्य पार पाढत आहेत. त्यामुळे सरकारने केलेली पगारवाढ ही त्यांच्या कामाची एक पोचपावती असल्याचेच मानले जात आहे.