राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief minister Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक (Sarsanghchalak मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे शिवसेना-भाजप (BJP-Shiv Sena) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या कहाणीला आज (मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019) रात्री नवेच वळण मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानाने मुंबईहून थेट नागपूर येथे दाखल झाले. विमानतळाहून ते थेट संघ मुख्यालयात पोहोचले. रात्री 9.30 च्या सुमारास मुख्यमंत्री संघ मुख्यालयात (RSS Headquarters) दाखल झाले. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्याबद्दल प्रसारमाध्यमं किंवा इतर राजकीय वर्तुळात कानोकानी खबरही नव्हती. संघ मुख्यालयात मोहन भागवत आणि देवेंद्र फडणीस यांच्यात ही बैठक पार पडत आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी यांच्याकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात बोलली जाऊ लागली आहे. (हेही वाचा, गोपीनाथ गडावर उद्धव ठाकरे यांच्या पायाला दुखापत; पायाला बँडेज बांधून पुढच्या दौऱ्यासाठी रवाना)
एएनआय ट्विट
Nagpur: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis reaches RSS Headquarters to meet RSS Chief Mohan Bhagwat. (File pics) pic.twitter.com/zQctbh6Awi
— ANI (@ANI) November 5, 2019
दरम्यान, शिवसेना भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सोडविण्यासाठी संघाने पुढाकार घ्यावा असे बोलले जात होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस भागवत यांचा सल्ला घेण्यासाठी नागपूरला पोहोचले असावेत अशी चर्चा आहे. दोन्ही पक्षातील सत्तासंघर्षाचा तिढा सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन भाजप पक्षाध्यक्ष आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. त्यानंतरही हा तिढा सुटू शकला नाही. त्यामुळे अखेर देवेंद्र फडणवीस हे नागपूरला पोहोचले असल्याचे बोलले जात आहे.