Chandrapur Crime: चंद्रपुर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा वियनभंग झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीची छेडछाड करणारा आरोपी पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. पाच जणांनी पीडीत मुलींची छेडछाड केली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेचे दखल जिल्हा पोलीस अधिक्षक रवीद्रं परदेशी यांनी घेतली आहे. या घटनेतील आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.
आरोपी सचिन हे पोलीस C-60 दलात कामाला होते. चंद्रपुर जिल्ह्यात मामला परिसरात ही घटना घडली आहे. दोन जोडपी बाईक वरुन फिरायला गेले असताना ते रस्त्याच्या कडेला उभे राहीले. याचदरम्यान रस्त्यात एका कार मध्ये बसलेल्या पाच जणांनी ह्या जोडप्यांना पाहिले. दरम्यान त्या पाच जणांनी जोडप्यांना शीवीगाळ सुरु केला आणि एका मुलींला जबरदस्तीने कार मध्ये बसवल्याचे समोर आले. एका मुलीचा वियनभंग केल्याचे समोर आले. या घटनेत त्यांचात मारहाण देखील झाली. आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे.
ह्या जोडप्यातली मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या घटनेतून मुलींनी कशीबशी सुटका करत पोलीस ठाण्यात आल्या आणि त्या पाच आरोपींविरोधात तक्रार नोंदवली आहे. या घटनेची तपासणी जिल्हा पोलीस अधिक्षक करत आहे. पोलीसांनी त्या पाच आरोपांना अटक केले आणि पोलीस कर्मचारी सचिन याला कामातून तात्काळ निलंबन केले आहे. अशी माहिती पोलीस अधिकारांनी दिली आहे. संतोष कुशवाह, महेंद्रसिंह सनोतरा, शंकर पिल्ले आणि संतोष कानके अशी अटक केलेल्या इतर चार आरोपींची नावं आहेत. त्यांचावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिकारांनी दिली आहे.