विना तिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे Central Railway च्या उत्पन्नात 'अशी' झाली वाढ
मुंबई लोकल | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

मध्‍य रेल्वेकडून विना विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरूध्‍द एक मोहीम राबविण्यात आली होती. आणि विशेष बाब म्हणजे याच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेला प्रचंड मोठा फायदा झाल्याचं समोर आलं आहे.

कसा झाला फायदा?

मध्य रेल्वेने ऑक्टोबर 2019 या महिन्यात तिकीट तपासणीतून 22.87 कोटी रुपये मिळविले आहेत. परंतु ऑक्टोबर 2018 मध्ये मात्र ही रक्कम फक्त 13.42 कोटी रुपये इतकीच होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 70.32 टक्के आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये एकूण ४.२५ लाख विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींची नोंद आहे. तर एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत विना तिकीट, अनियमित प्रवास व अन-बुक केलेल्या सामानांच्या एकूण तक्रारींचा एकदा पहिला तर तो 24.04 लाख इतका आहे. आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद 126.67 कोटी रुपये इतकी झाली आहे.

विनातिकीट फिरणाऱ्या प्रवाशांमुळे BEST ला 132 कोटींचा फटका; जाणून घ्या 2018-19 ची आकडेवारी

मध्य रेल्वे कडून दिवाळी आणि छठ पूजेच्या सणांच्या दरम्यान ही विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती आणि अनियमित प्रवासाला प्रतिबंध करण्यासाठी या मोहिमेमुळे नक्कीच मदत झाली आहे.

त्यामुळे मध्य रेल्वे अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही अनेकदा राबवण्याची शक्यता आहे.

दरम्यान मध्य रेल्वेने दिवाळीनिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली होती, ज्यामुळे रेल्वेच्या महसुलात भरघोस वाढ झाली आहे. दिवाळीच्या 2 आठवड्यात रेल्वेच्या महसुलात एकूण 18 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.