धुक्यामुळे उशिरा धावणार्‍या रेल्वे फेर्‍यांवर मध्य रेल्वेचा तोडगा, वेळापत्रकात होणार बदल
मुंबई लोकल | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

Mumbai Local Winter Time Table  : रेल्वे सेवा (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे. रोज लाखो प्रवासी मुंबईमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. प्रामुख्याने हिवाळ्याच्या दिवसात मध्य रेल्वे उशिरा धावण्यामागचे एक कारण म्हणजे धुकं आणि थंड वातावरणामुळे रूळांना जाणारे तडे हे आहे. मध्य रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना 'लेटमार्क' लागत आहे. पण आता हा उशिर टाळण्यासाठी मध्य रेल्वेने वेळापत्रकामध्ये (Central Railway Timetable)  बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

'महाराष्ट्र टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार गुरूवारी मुंबईत खास बैठक पार पडली. मध्य रेल्वे आणि रेल्वे प्रवासी संघटना यांनी पहिल्यांदाच एकत्र चर्चा करून वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हिवाळ्याच्या दिवसात खोपोली, कर्जत, कसारा या स्थानकांदरम्यान प्रचंड धूकं असतं. यामुळे रेल्वेचं वेळापत्रक अनेकदा कोलमडतं. परंतू आता हा त्रास टाळण्यासाठी पहाटेच्या गाड्या सध्याच्या वेळापत्रकापेक्षा किमान 10-15 मिनिटं लवकर सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. Mega Block : Centrail Railway चा 13-17 डिसेंबर दरम्यान पाच रात्रींचा मेगाब्लॉक, 14 लोकल सेवा रद्द

हवामान विभागाशी बोलणी करून मध्य रेल्वे लवकरच कोणत्या गाड्यांच्या वेळामध्ये बदल करण्यात येईल याची माहिती प्रवाशांना देणार आहे. नव्या वेळापत्रकाबाबत रेल्वे स्थानकांवर उदघोषणा करून माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले आहे.