Mega Block : Centrail Railway चा 13-17 डिसेंबर दरम्यान पाच रात्रींचा मेगाब्लॉक, 14 लोकल सेवा रद्द
मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

Central line Night Mega Block :  रोज 'मरे' त्याला कोण रडे ! असे म्हणत मध्य रेल्वेचे (Central Railway) प्रवासी नेहमी प्रवास करतात. पण लवकरच मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा त्रास थोडा हलका होणार आहे. अनेकदा सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा होतो. त्यामुळे आता मध्य रेल्वेवर पारंपारिक सिग्नल यंत्रणा काढूण नवीन रुट रिले इंटरलॉकिंग पॅनल (Route Relay Interlocking Panel) यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या या सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी 13 ते 17 डिसेंबर या काळात खास नाईट ब्लॉक ( Night Block) घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर नाईट ब्लॉक

मध्य रेल्वेवर दादर (Dadar) आणि माटुंगा (Matunga) स्थानकादरम्यान नव्या सिग्नल यंत्रणेसाठी नाईट ब्लॉक घेऊन काम केले जाणार आहे. या कामासाठी रात्री शेवटच्या कुर्ला आणि ठाणे रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रात्री धावणार्‍या काही मेल एक्सप्रेस गाड्यांनादेखील वळवण्यात आले आहे. Water Vending Machines द्वारा रेल्वेस्थानकांवर मिळणारे पिण्याचे पाणी महागले !

कसे काम करणार नवी सिग्नल यंत्रणा

मध्यरेल्वेची नवी सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक यंत्रणेवर अवलंबून आहे. यामध्ये रुट रिले इंटरलॉकिंग पॅनलमध्ये खास कॉम्युटर चिप्सचा वापर करण्यात आला आहे. या नाईट ब्लॉकच्या कामामध्ये सायन ते परळ या स्थानकांदरम्यानच्या मार्गिकांवरही खास सिग्नल व्यवस्थेमध्ये केले जाणार आहे. नव्या सिग्नल यंत्रणेमध्ये मानवी चूकांची शक्यता कमी आहे. परिणामी अपघात, गाड्यांना उशिर होणं या समस्या कमी करण्यात मदत होणार आहे.