भारतीय रेल्वेद्वारा (Indian Railway) स्थानकांवर खास वेडिंग मशीनद्वारा (Water Vending Machines ) उपलब्ध करून देणारे पाणी आता सामान्य प्रवाशांसाठी महागले आहे. स्वस्त दरात प्रवाशांना पाणी मिळावे याकरिता रेल्वेने स्थानकांवर खास वेडिंग मशिन्स उभरल्या आहेत. मात्र आता स्थानकावर मिळणार्या या पाण्याच्या सोयीसाठी प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
IRCTC ने जारी केलेल्या नोटिसीनुसार, सध्या 300ML पाण्याच्या ग्लाससाठी दोन रूपये मोजावे लागणार आहेत तर अर्धा लीटर पाणी दोन रूपयांमध्ये आणि एक लीटर पाणी पाच रूपयांमध्ये तसेच दोन लीटर पाणी आठ रूपयांमध्ये मिळणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी खास माफक दरात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ने सर्व स्थानकांवर पाणी उपलब्ध करून दिले आहे. मानवविरहित असल्याने कोणीही केवळ तुमच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार दिलेल्या किंमतीचं कॉईन त्य मशीनमध्ये टाकून पाणी विकत घेऊ शकतो.