मध्य रेल्वेच्या (Central Railway) कल्याण (Kalyan) स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने काही वेळापासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहून कसाऱ्याच्या (Kasara) दिशेने जाणाऱ्या मार्गावर रुळाला तडा गेल्याने कल्याण-कसारा या दरम्यान रेल्वे विलंबाने धावत आहेत. रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या मार्गावरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की दर रविवारी मध्य रेल्वेवर ठिकठिकाणी रेल्वे रुळापासून ते सिग्नल यंत्रणा तपासणी पर्यंत अनेक तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेतला जातो मात्र तरीही एक दिवस न होताच अनेकदा अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवतात. आजही काहीसा असाच प्रकार कल्याण ते कसारा स्थानकाच्या दरम्यान पाहायला मिळाला आहे. ठाणे- वाशी/ पनवेल एसी लोकल 30 जानेवारी पासून प्रवाशांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर
प्राप्त माहितीनुसार, कल्याणहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील म्हणजेच कल्याण ते शहाड या दरम्यानच्या रुळाला तडा गेला आहे. रेल्वे कर्मचारी या रुळाची दुरुस्ती करत आहेत. मात्र यामुळे कल्याण-कसारा वाहतूक काही काळ पूर्ण ठप्प झाली होती. परिणामी अप मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान या कारणामुळे उद्या सकाळी कामावर जाण्याकय्या वेळेतही रेल्वे उशिराने धावण्याची पूर्ण शक्यता आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांचे गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेचे कर्मचारी तात्काळ दुरुस्तीचे प्रयत्न करत आहेत.