AC local trains (Photo Credit: PTI)

पश्चिम रेल्वे (Western Railway)  नंतर आता या महिन्या अखेरीपासून ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावर सुद्धा एसी लोकल (AC Local) धावणार आहे. गुरुवार, 30 जानेवारी रोजी मध्य रेल्वे (Central Railway) वरील वातानुकूलित लोकलचे उद्घाटन करण्याचे रेल्वेने निश्चित केले आहे. ठाणे-वाशी (Thane- Vashi) , ठाणे-पनवेल (Thane- Panvel) आणि ठाणे-नेरुळ (Thane- Nerul) अशा या लोकलच्या दिवसातून सोळा फेऱ्या होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एसी लोकलचे तिकीट ठाणे-वाशी मार्गासाठी सुमारे 130 रुपये आणि ठाणे-पनवेल मार्गासाठी सुमारे 175 रुपये असेल, 30 जानेवारीला ठाणे ते पनवेल अशी उदघाटनाची लोकल चावलण्यात येईल आणि 31 जानेवारी पासून या लोकलच्या नियमित फेऱ्या सुरु होणार आहेत. (मुंबई: पश्चिम रेल्वे एसी लोकलच्या 8 नव्या लोकल फेर्‍या वाढवणार?)

प्राप्त माहितीनुसार, 27 ते 30 जानेवारी या काळात रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी विविध कार्यक्रमांसाठी बेंगळुरू, दिल्ली आणि मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आहेत. 30 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलचे रेल्वेमंत्री उद्घाटन करतील. अशी माहिती आहे. या एसी लोकलची वैशिष्ठ्य ही पश्चिम रेल्वे वर सध्या कार्यरत असणाऱ्या लोकलशी मिळती जुळती आहेत, मात्र या लोकलची उंची मात्र काही इंचाने कमी करण्यात आली आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल असल्याने उंचीच्या बाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेला 2019 डिसेंबर महिन्यातच एसी लोकलची डिलेव्हरी चेन्नई मधून मिळाली हे. त्यानंतर 3 आठवडे कल्याण-बदलापूर, सीएसएमटी-कल्याण या मार्गावर वातानुकूलित लोकलची चाचणी घेण्यात आली होती. आणि आता महिनाखेरीपासून या सुविधेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे.