Car Falls Into Gorge प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - X/@WillyAbuga)

Car Falls Into Gorge At Varandha Ghat: सोमवारी पहाटे पुण्यातील वरंधा घाटात (Varandha Ghat) नऊ प्रवाशांना घेऊन जाणारी कार भोर-महाड रस्त्यावरील (Bhor-Mahad Road) 100 फूट खोल दरीत (Gorge) पडली. महाडहून भोरला जात असताना पहाटे 4:00 वाजता उंबर्डे गावाजवळ गाडीचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

जखमी प्रवाशांवर उपचार सुरू -

प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे ती रस्त्यावरून वळून खोल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक अधिकारी आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापी, आपत्कालीन मदत पथकांनी तातडीने परिसर सुरक्षित करण्यासाठी आणि बचाव कार्य सुरू करण्यासाठी काम केले. (हेही वाचा -Pune Accident: पुणे हिंजवडीत डंपर खाली चिरडून दोन तरुणींचा जागीच मृत्यू)

बारामतीत डंपरने मोटारसायकलला धडक, एकाचा मृत्यू -

दरम्यान, रविवारी बारामतीतील तांदुळवाडी येथे एका भरधाव डंपरने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी हे तरुण कॉलेजमधून घरी जात होते. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. डंपर चालकाने अचानक यू-टर्न घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे दुचाकीवरील तरुणांचे नियंत्रण सुटले आणि ते पडले. यातील एका विद्यार्थ्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. (हेही वाचा - Railway Track Rod Falls On Auto In Warangal: हृदयद्रावक! तेलंगणातील वारंगलमध्ये लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी)

तथापी, अपघातानंतर दुचाकीवरी दुसऱ्या तरुणाने डंपर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, डंपर चालक खाली उतरला आणि घटनास्थळावरून पळून गेला. तरुणाने चालकाचा पाठलाग केला, पण चालक तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या घटनेमुळे मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.