Railway Track Rod Falls On Auto In Warangal (फोटो सौजन्य - X/@NewsMeter_In)

Railway Track Rod Falls On Auto In Warangal: तेलंगणातील (Telangana) वारंगल (Warangal) येथे एक मोठा रस्ता अपघात (Accident)  झाला. ट्रक आणि दोन ऑटोरिक्षा एकमेकांना धडकल्या. या अपघातात एका मुलासह सात जणांना आपला जीव गमवावा लागला तर सहा जण जखमी झाले. वारंगल-मामुनुरु रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडाने भरलेल्या एका लॉरीने दोन ऑटो रिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा अपघात झाला. ओव्हरटेक करताना, लॉरीमधून एक लोखंडी रॉड ऑटो रिक्षावर पडला आणि त्यात सात जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये चार महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत -

पोलिस तपासात ट्रक चालक मद्यधुंद असल्याचे समोर आले. त्याने ट्रक वेगाने चालवला आणि अचानक ब्रेक लावल्याने लॉरी उलटली. लॉरीमध्ये ठेवलेला लोखंडी रॉड ऑटो रिक्षावर पडला, ज्यामुळे हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी लॉरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे. (हेही वाचा -Student Dies After Run Over by Dumper In Baramati: बारामतीमध्ये डंपरने चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, पहा अपघाताचा थरार)

ट्रक चालकाला अटक

या अपघातानंतर जिल्हाधिकारी, पोलिस आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. जड क्रेनच्या मदतीने लोखंडी रॉड काढून टाकण्यात आला आणि लॉरी ट्रक घटनास्थळावरून बाजूला करण्यात आला. पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना माहिती दिली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

ट्रक चालकावर गुन्हा दाखल -

प्राप्त माहितीनुसार, चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही ऑटोचे पूर्ण नुकसान झाले आहे.