Student Dies After Run Over by Dumper In Baramati: बारामतीतील तांदुळवाडी येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. वेगाने येणाऱ्या डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी हे विद्यार्थी कॉलेजमधून घरी जात होते. यावेळी डंपरने अचानक यूटर्न घेतला. त्यानंतर समोरून दुचाकीवर येणारे दोन विद्यार्थी खाली कोसळले. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना घटनास्थळाजवळ असेलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
बारामतीमध्ये डंपरने चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू -
बारामती शहरात डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात झाला. परीक्षा देऊन घरी निघालेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. #Accident pic.twitter.com/jmVXIGRY6u
— Lokmat (@lokmat) January 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)