Jalgaon: शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला अपघात; थोडक्यात बचावले सोनवणे दाम्पत्य
Accident (PC- File Photo)

Jalgaon: महाराष्ट्रातील जळगावमध्ये भीषण दुर्घटना टळली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे (MLA Lata Sonawane) यांच्या गाडीला डंपरने धडक दिली. या धडकेतून त्या सुदैवाने बचावली. जळगाव तालुक्यातील चोपडा-जळगाव मार्गावरील करंज गावाजवळ शनिवारी हा अपघात झाला. आमदार लता सोनवणे व त्यांचे पती माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे चोपडा येथून जळगावकडे मोटारीने जात होते.

वृत्तानुसार, आमदार लता सोनवणे यांच्या इनोव्हा कारला चोपडाहून जळगावला जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. सुदैवाने दोघेही बचावले. दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. चंद्रकांत सोनवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Beed Crime: बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर वाळू माफियांचा हल्ला, सुरक्षारक्षक जखमी, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक)

या घटनेची माहिती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की, या अपघातानंतर केवळ नशिबामुळे आम्ही जिवंत आहोत.