मुंबई मध्ये पोलिसांनी एका जोडप्याविरूद्ध 40 जणांना फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॅनडा चा वर्क व्हिसा मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यांच्याकडून 1.63 कोटी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे जोडपं मालाड परिसरातील आहे. Rina Shah आणि Gaurav Shah असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे. कॅनडा वर्क व्हिसामध्ये फसवणूकीचं (Canada Work Visa Fraud) प्रकरण एक महिलेने तक्रार केल्यानंतर समोर आलं होतं असं वृत्त Indian Express ने दिले आहे.
तक्रारदार देखील मालाड ची रहिवासी आहे. 40 जणांच्या फसवणूकीमध्ये 163 कोटींचा व्यवहार झाल्याचं सांगितलं आहे. या महिलेला देखील कॅनडा मध्ये कामाला जाण्याची इच्छा होती त्यासाठी तिने या जोडप्यांची मदत घेतली. या जोडप्याने तिच्याकडून 7.16 लाख रूपये प्रोसेसिंग फी म्हणून घेतले आहेत. तिला जेव्हा वेळेवर व्हिसा मिळाला नाही तेव्हा शाह दांम्पत्याला तिने प्रश्न विचारले. त्यांनी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर थोडी शोधाशोध केल्यानंतर तिच्याप्रमाणे अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर तिने पोलिसांत जाणून तक्रार नोंदवली. यामध्ये शाह दांम्पत्यांनी ऑनलाईन मीडीया सेंटर्स देखील उघडल्याचा दावा केला आहे. जिथे व्हिसाचं स्टेटस पाहता येऊ शकतं. मात्र जेव्हा फ्रॉड झाल्याचं समोर आलं तेव्हा त्यांनी सोशल मीडीयावरील ही सेंटर्स देखील बंद केली.
आतापर्यंत 40 जण त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पुढे आले आहेत. अजूनही अनेकजण या फसवणूकीमध्ये अडकले असण्याचा अंदाज आहे. दरम्यान, व्हिसा देणाऱ्या एजन्सीचे बळी गेल्याचे आरोपींनी पीडितांना सांगितले आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.