CAA Protest: दिल्लीतील शाहीन बागच्या (Shaheen Bagh) धर्तीवर मुंबईतील नागपाडा (Nagpada) येथे सुधारित नागरिकत्त्व कायद्या (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात मुस्लिम महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या महिलांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पुरुषदेखील आंदोलनात उतरले आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन ठिकाणी पोलिस बंदोस्त करण्यात आला आहे. केंद्र सरकार जोपर्यंत CAA आणि NRC मागे घेत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलक महिलांनी सांगितलं आहे. या आंदोलनात मुंबईच्या विविध भागातून महिला सहभागी आहेत. राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन महिला सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहे. (हेही वाचा - Union Budget 2020: Income Tax कपात, विविध सवलतींसह अर्थसंकल्प २०२० मध्ये केंद्र सरकार विमा क्षेत्राला काय गिफ्ट देणार? जनतेला अपेक्षा)
Mumbai: People hold protest against Citizenship Amendment Act, National Register of Citizens and National Population Register, at Morland Road. #Maharashtra pic.twitter.com/fXG8OpY2l7
— ANI (@ANI) January 27, 2020
Maharashtra: Women hold protest against Citizenship Amendment Act (CAA), National Register of Citizens (NRC) and National Population Register (NPR) in Madanpura, Mumbai Central. pic.twitter.com/ZcwFzd0T82
— ANI (@ANI) January 26, 2020
गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील शाहीनबाग परिसरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी शाहीन बाग परिसरातील महिला एकत्रित आल्या आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनाचा कोणीही नेता नसून महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.