Shriniwas Patil, Udayanraje Bhosale_AC | (Photo credit: Archived, edited, representative images)

Bypoll election 2019: महाराष्ट्रात आज (21 ऑक्टोबर) 288 मतदारसंघात विधानसभा निवडणूक पार पडत आहे. यासोबतच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकही पार पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे सातारा लोकसभा ( Satara Lok Sabha Constituency) मतदारसंघासह संपूर्ण भारतात एकूण 18 राज्यांमध्ये 51 विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका पार पडत आहेत. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात सातारा लोकसभा मतदारसंघ आणि बिहार येथील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूका पार पडत असलेल्या बहुतांश मतदारसंघाती बहुतांश आमदार, खासदारांनी निवडूण आल्यावर आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. तर काही जागांवरील आमदार, खासदाराचा मृत्यू झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या सर्व जागांवर पोटनिवडणूक पार पडत आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील असा सामना रंगला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे या पोटनिवडणूकीकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडूण आल्यावर उदयनराजे भोसले यांनी अवघ्या तीन महिन्यांतच राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आता पुन्हा पोटनिवडणूक लागली आहे. इथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तर श्रीनिवास पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या केंद्रीय नेत्यांच्या सामन्यात जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार याबाबत उत्सुकता आहे.

उत्तर प्रदेश राज्यात गंगोह, रामपूर. इगलास, लखनऊ कँट, गोविंदनगर, मानिकपूर, प्रतापगड, जैदपूर, जलालपूर, बलहा आणि घोसी या 11 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूका पार पडत आहेत. भाजप, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेस या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. तर, छत्तीसगड राज्यात चित्रकूट येथील विधानसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर हे '3' महत्वाचे मुद्दे टाकू शकतील प्रभाव)

दरम्यान, पंजाब आणि असाम राज्यांत एकूण 4 तर, आसम, राजस्थान, सिक्कीम, पंजाब राज्यांमध्ये अनुक्रमे दोन, तीन, चार जागांवर निवडणूक लढवली जात आहे. तर ओदिशा रज्यात बीजेपूर या विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. अरुणाचर प्रदेश राज्यातही खोंसा पश्चिम या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. तर तामिळनाडू राज्यात विक्रवंदी आणिी नानगुनेरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. दरम्यान, केरळमध्ये पाच आणि हिमाचलमध्ये २ जागांवर पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडत आहे.