Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबईतील सर्वात गजबलेले ठिकाण म्हणजे भायखळा (Byculla) स्टेशन. महालक्ष्मी, वरळी यांसारख्या अनेक स्थानकांना जोडणारे हे रेल्वे स्थानक नेहमीच वर्दळीचे असते. या स्थानकावरील पादचारी पुलाचा वापरही प्रचंड प्रमाणात होत असतो. मात्र हाच पुल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण दिशेकडील फलाट क्रमांक 1,2,3 आणि 4 ला जोडणारा हा पूल काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार असून वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

हे दुरुस्तीचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची देखील कोंडी होणार आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना हा पूल बंद असल्या कारणाने प्रवाशांचे नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

पाहा मध्य रेल्वेचे ट्विट:

हेदेखील वाचा- माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड; किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

यातील पहिल्या टप्प्यात भायखळा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ते प्लॅटफॉर्म क्रमांक 3 येथील पूल बंद राहील. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ते प्लॅटफॉर्म क्रमांक 1 प्रवाशांसाठी सुरु राहिल.

तर दुस-या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ते प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील पूल प्रवाशांसाठी बंद राहिल. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ते प्लॅटफॉर्म क्रमांक 3 येथील पूल सुरु राहील.

नागरिकांना होणा-या गैरसोयीमुळे आम्ही क्षमस्व आहोत असे मध्य रेल्वे ट्विट केले असून प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.