बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पोलीस ठाण्यात बोलावून फिर्यादीलाच अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्या आरोपीने फिर्यादीला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ (Video) तयार करण्यात आला. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तामगांव पोलीस ठाण्यातील ही घटना असल्याचे समोर येत आहेत. (हेही वाचा - Pune Drugs: ड्रग्स प्रकरणात पोलिस उपनिरिक्षकाला अटक, पिंपरी चिंचवड येथील धक्कदायक प्रकार)
एक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतांना पाहायला मिळत आहे. पोलीस ब्लेटने कधी हातावर तर कधी पायावर जोरजोरात ही मारहाण करण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सुरवातीला हा पोलीस कर्मचारी संबंधित फिर्यादीला हात पुढे करायाला सांगतो. शेख मतीन शेख मोबीन हा रिक्षाचालक तरुण आहे. त्याचा भाड्याने ऑटो रिक्षा का घेत नाही, म्हणून दोन युवकांमध्ये वाद झाला होता. वादानंतर या प्रवाशाने तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस स्टेशनला बोलावले. यावेळी पोलिसांनी तरुणावर कोणतीही कारवाई न करता फिर्यादीलाच बेदम मारहाण केली.
या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज या पोलिसाला निलंबित करून त्याचे विरुद्ध कारवाई करीत असल्याचे सांगितले आहे. तसेच ज्याला मारहाण झाली त्याची तक्रार केंद्रीय व राज्य मानावधिकारकडे तक्रारसुद्धा करण्यात आली आहे.