pune drugs pc twitter

Pune Drugs: पुण्यात काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणाला आळा घालण्यासाठी पोलिसांची तारांबळ चालू आहे. धक्कादायक म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात एका पोलिस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस आयुक्तलायत एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारच्या पहाटे रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्ज आढळलं होतं. पोलिसांनी तपासणी दरम्यान नमामी झा ला अटक केले होते. त्यानंतर चौकशी आणि तपासणी धक्कादायक खुलासा झाला आणि पोलिस उपनिरिक्षकाचे नाव समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास शेळके असं पोलिस उपनिरिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी विकास यांना अटक करण्यात आले आहे. ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने पुण्यात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन आढळलं होतं. या ड्रग्जची किंमत बाजारात २ करोड ३८ लाख रुपये इतकी होती. गुपीत माहितीच्या आधारे पोलिसांनी नमामी शंकर झा ला अटक करण्यात आले. हेही वाचा- ॲट्रॉसिटी कायद्यावरील टिप्पणीवरुन अभिनेत्री Ketaki Chitale हिच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. पुणे पोलिसांकडून उपनिरिक्षकाला अटक केल्याप्रकरणी गुप्तता पाळण्यात येत आहे. या प्रकरणा व्यापी असणार असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.